VishwaRaj

क्रायोप्रिजर्वेशन म्हणजे काय? What is Cryopreservation Marathi

Video Description

क्रायोप्रिजर्वेशन म्हणजे काय? What is Cryopreservation Marathi Ashish Kale ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .

क्रायोप्रिजर्वेशन म्हणजे काय ?

समजा मुलाला- मुलीला उशिरा लग्न करायच असेल किंवा त्यांना उशिरा मुलं हवं असेल किंवा मुलाला- मुलीला करिअर घडवायचा असेल व त्यासाठी बराच वर्षांचा कालावधी असेल, किंवा एखाद्या स्त्रीला गर्भाशयाचा कॅन्सर झाला तर तिला मुलं होऊ शकत का ?

एखाद्या मुलाला पेनाईल कॅन्सर असेल तर अशावेळेस आपण त्याचे वीर्य स्टोर करून ठेवतो कारण जर कॅन्सर च्या शस्त्रक्रियेमध्ये त्याला तो भाग काढावा लागला तर त्याला शास्त्रक्रिये नंतर कधीच मूल होणार नाही . अशा वेळेस आपण त्याचे वीर्य अनेक वर्षांच्या कालावधी साठी स्टोर करून ठेऊ शकतो
आणि त्याचा उपयोग नंतर त्यांना मुलं होण्यासाठी करु शकतो.

या प्रक्रियेला आपण क्रायोप्रिजर्वेशन ऑफ द सिमन सॅमपल (Cryopreservation of the simon sample) असे म्हणतो.

जर एखाद्या मुलीला उशिरा मुलं हव असेल किंवा मुलींच्या वयानुसार त्यांच्यामध्ये ४५ ते ४८ वया नंतर स्त्रीबीज तयार होत नाहीत.

तर अशा वेळेस जसे पुरुषांचे वीर्य स्टोर करून ठेऊ शकतो तसेच स्त्रियांचे बीज देखील आपण स्टोर करून ठेऊ शकतो.

आणि कॅन्सर उपचारानंतर तिच्या स्त्रीबीज पासून मूल बनू शकतो आणि ते तिच्या गर्भाशयात प्रत्यरूप करू शकतो.

त्यालाच आपण एम्ब्रयो ट्रान्सफर (Embryo Transfer) म्हणतो.

या क्रायोप्रिजर्वेशन पद्धतीच्या उपयोगाने स्वतःचे मूलं होण्यास खूप मदत होते.

Patient also want to know