आज आपले विश्वराज हॉस्पिटल च्या माहेर टॉक्स च्या ७ व्या एपिसोड मध्ये स्वागत आहे.
आज आपण नवजात शिशु अतिदक्षता विभाग बद्दल बोलणार आहोत. जिथे नवीन बाळाला जन्म झाल्यावर ठेवले जाते. अतिदक्षता विभाग म्हणजे बाळाचा जन्म झाल्यावर त्याला श्वास घ्याल त्रास ,शुगर मेन्टेन नसेल , हार्ट चा प्रॉब्लेम असेल तर अशा बाळांना आपण एनआयसीयु मध्ये ठेवतो.
एनआयसीयु म्हणजे नॅशनल इंटेन्सिव्ह केअर युनिट. यामध्ये आपण २८ दिवसापर्यंत आपण बाळाला एका स्पेसिअल एरिया मध्ये ठेवतो ते ओटी सारखेच असते. तिथे बाळाची केअर चांगली होते. बाळाची काळजी घेतली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं इन्फेकशन कंट्रोल होते. एनआयसीयु च इन्फ्रास्ट्रक्चर कस आहे म्हणजे दोन बाळमधील डिस्टन्स महत्वाचं आहे जेणेकरून एका बाळाचं इन्फेकशन दुसऱ्या बाळाला होऊ नये.
तिथे इन्फ्रास्ट्रक्चर मशीन अव्हेलेबल आहे का इ सि जी आहे का २ डी इको आहे का. हे सर्व असेल तर बाळाला एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायची गरज नाही.
एनआयसीयु मध्ये डॉक्टर्स , नर्सिंग स्टाफ यांची खूप गरज पडते. जिथे हाय रिस्क बेबी ची काळजी घेतली जाते तो एनआयसीयु चांगला.
एनआयसीयु मध्ये मुलांना मॉनिटरिंग करणे गरजेचे आहे.