नमस्कार , मागच्या भागात आपण स्तनपान समाज गैरसमज यांबद्दल बोलत होतो
याच विषयाला आपण पुढे नेणार आहोत बऱ्याचदा आपण पाहतो कि खूप स्त्रियांच्या मध्ये हा गैरसमज आहे कि ताप आला कि विशेषतः
लसीकरण नंतर किंवा व्हायरल इन्फेक्शन मुळे जो ताप येतो तो आला तर बाळाला दूध नाही पाजले पाहिजे किंवा आईला ताप आल्यास देखील बाळाला
दूध नाही पाजले पाहिजे तर अशावेळी जर तो ताप वातावरण बदला मुले आला असेल किंवा सर्दी खोकला झाले असेल तर त्याचे काही दुष्परिणाम बळावरती होत
नाहीत आई बाळाला दूध पाजणे चालू ठेऊ शकते याउलट आईला जेव्हा आजारपण येते तेव्हा आईच्या शरीरात ज्या पांढऱ्या पेशी बनतात ज्या या विषाणूशी लढतात त्यादेखील बाळाला दुधावाटे मिळतात पण जरा आईला खूपच जास्त त्रास होत
असेल उठणे होत नसेल तर त्यावेळी आईने दूध काढून कोणाला तरी आले तर ती व्यक्ती चमच्याने बाळाला दूध पाजू शकते संसर्गजन्य आजार असेल तर आई मास्क लावून बाळाला स्तनपान करू शकते योग्य स्वच्छता राखणे तसेच शिंक किंवा खोकला आल्यास बाळापासून थोडे दूर होणे यासारख्या दक्षता घेऊन बाळाला दूध पाजणे चालू ठेऊ शकता तसेच तापात डिहायड्रेशन मुळे स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे असते .
पण बाळाला दूध पाजणे खूप गरजेचे आहे WHO च्या सल्ल्यानुसार बाळाला पहिले ६ महिने फक्त आईचे दूधच द्यायला हवे