Busting Myths about Breast Feeding | Maher Talks.
- Written by: Department of Dental Sciences
- Published: June 22, 2022
- 4 min Read
Video Description
स्तनपानाबद्दलच्या गैरसमजांचे निरसन/निराकरण | Busting Myths about Breast Feeding | Maher Talks. | Dr. Yogini Patil & Dr Sangeeta Kharate ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .
नमस्कार विश्वराज हॉस्पिटल च्या माहेर टॉक्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे, स्तनपान हा स्त्री च्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा भाग तसेच अतिशय सुखद अनुभव आहे.
स्तनपाना बद्दल स्त्रिया जेवढ्या उत्सुक असतात तेवढ्याच त्यांच्या मनात या बद्दल अनेक समज गैरसमज असतात.
बऱ्याच स्त्रियांना हा आत्मविश्वास नसतो कि त्यांना जमेल कि नाही त्यांचे दूध बाळाला पुरेसे होईल कि नाही स्तनपानाच्या दरम्यान मी काय खाल्ले पिल्ले पाहिजे त्याचा माझ्या बाळाच्या आरोग्यावर काय परिणाम होईल याबद्दल आपण जाणून घेऊयात , सर्वांत पहिले म्हणजे गरोदर पणांनंतर हा काही आजार आई ला जडलेला नसतो त्यामुळे आईने खूप सारी पत्थ्ये पाळली पाहिजेत असे नसते गरोदर पानात जे अन्न ती घेत होती म्हणजे वरण भात भाजी पोळी सॅलड फळे असा समतोल आहार तिने घेतला पाहिजे कारण स्तनपान करते वेळी दिवसाला तिच्या ५०० ते ६०० कॅलरिज बर्न होतात ती झीज भरून काढण्यासाठी तिने पूरक आहार घ्यायला हवा