VishwaRaj

# मुळव्याधनॉर्मलआहे

मुळव्याधाने त्रस्त आहात का?

( मूळव्याध, फिशर/ भगंदर)

तुम्हाला शौचाच्या मार्गातून रक्त पडणे, शौचास होताना असह्य वेदना होणे, कडक शौचास होणे अशा प्रकारचे त्रास आहेत का?
” ही वरील लक्षणे गुदद्वाराच्या किंवा शौचाच्या मार्गाच्या आजाराची आहेत. जवळपास 50% लोकांमध्ये आयुष्याच्या ठराविक टप्प्यामध्ये अशा प्रकारची गुदद्वाराच्या आजाराची लक्षणे उद्भवतात कदाचित या बरोबरच ते वयाची पन्नाशी गाठतात, आणि सरासरी 20 लोकांमध्ये 1व्यक्ती या काळामधे गुदद्वाराच्या आजाराने त्रस्त होतो. “

मूळव्याध काय आहे ( हिमोरॉईड्स )

मुळव्याध म्हणजे गुदद्वार आणि त्याच्या वरील बाजूस असणाऱ्या शौचाच्या मार्गामधील सुजलेल्या आणि फुगलेल्या रक्तवाहिन्या होय की ज्या अस्वस्थता व रक्तस्त्रावास कारणीभूत ठरतात.

मुळव्याधाची सामान्य कारणे

शौचास करताना कुंथने

लठ्ठपणा

वरचेवर /सतत जड वजन उचलणे

अपॉइंटमेंट बुक करा

  मुळव्याधाचे वर्गीकरण

  स्टेज 1

  गुदद्वाराच्या आतील आवरणावर छोट्या प्रमाणामध्ये सूज निर्माण होते आणि ती सूज प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही

  स्टेज 3

  स्टेज 3 च्या मुळव्याधाला लोंबणारे (प्रोलॅप्सड ) मूळव्याध असेही म्हणतात कारण ते गुदद्वाराच्या बाहेर लोंबत असतात. यामध्ये रुग्णाला गुरदद्वाराच्या बाहेर लोंबणाऱ्या, फुगलेल्या, सुजलेल्या वाहिन्यांची किंवा गाठींची स्पर्शाने जाणीव होत राहते परंतु त्या गाठी पुन्हा गुदद्वारामध्ये ढकलल्या जाऊ शकतात.

  स्टेज 2

  मुळव्याधा च्या गाठी / सूज स्टेज 1 पेक्षा आकाराने मोठी असते परंतु ती गुदद्वाराच्या आतील बाजूस असते. शौचास होताना हा सुजलेला भाग गुदद्वाराच्या बाहेर येतो आणि आपोआप स्वतः हुन आत मध्ये जातो.

  स्टेज 4

  या स्टेजमध्ये गाठी गुदद्वाराच्या आतमध्ये ढकलता येत नाही, आणि या स्टेजला उपचारांची आवश्यकता असते. यामध्ये गाठी या मोठ्या झालेल्या असतात आणि गुदद्वाराच्या बाहेरच राहतात

  फिशर म्हणजे काय? ( फिशर इन ऍनो )

  फिशर म्हणजे गुदद्वाराच्या आतील बाजूस असणाऱ्या पातळ आणि ओलसर टिशू म्हणजेच म्युकोसाला पडलेल्या छोट्या-छोट्या भेगा किंवा चिरण्या होय. या भेगांबरोबर मूळव्याध सुद्धा असू शकतो. गुदद्वाराच्या फिशर मुळे शौचास होताना अतिशय असह्य वेदना आणि रक्तस्त्राव होऊ शकतो

  फिशर ची सामान्य कारणे

  जुनाट/ क्रॉनिक अतिसार

  असामान्यपणे गुदद्वाराच्या वर्तुळाकार स्नायूचा विलक्षण घट्टपणा

  फिशर चे वर्गीकरण

  ॲक्युट/ तात्पुरते फिशर:- 6 आठवड्यांमध्ये हे बरे होते

  2) क्रॉनिक/ जुनाट फिशर:- 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ हे फिशर टिकून राहतात. क्रॉनिक फिशर मध्ये नेहमीच त्वचेला टॅग आलेला असतो. या प्रकारामध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता असते.

  गुदद्वाराचे आजार लक्षामध्ये येण्यासाठीचे आवश्यक किंवा अनिवार्य फरक

  मुळव्याध


  1) गुदद्वारामध्ये किंवा शौचाच्या मार्गमधील सुजलेल्या रक्तवाहिन्या.
  2) सुरुवातीच्या स्टेजमध्ये वेदनारहित आणि सूज वाढेल तसा वाढत जातो.
  3) जुनाट बद्धकोष्टता, गरोदरपणा, जुनाट खोकला, शारीरिक तनाव यांमुळे मुळव्याध होतो.

  फिशर

  1) गुदद्वाराच्या त्वचेला पडलेल्या भेगा किंवा चिरण्या.
  2) अतिशय वेदनादायक आणि थोड्या किंवा अति रक्तस्त्रावाबरोबर अवस्थता.
  3) गरोदरपणा, लठ्ठपणा, गुदद्वाराच्या मार्गाला जखम, कडक शौचास होणे, जुनाट अतिसार यांमुळे फिशर होतात.

  जनरल सर्जन ला केव्हा भेटावे

  शौचास करताना रक्तस्त्राव होत असल्यास

  शौचास करताना वेदना होत असल्यास

  शौचास करताना शौचा बरोबर चिकट स्त्राव पडत असल्यास(म्युकस

  गुदद्वाराच्या मार्गामध्ये वेदनादायक कठीण गाठ असल्यास

  गुदद्वाराच्या ठिकाणी खाज सुटत असल्यास

  शौचाला जाऊन आल्यानंतर देखील पोटामध्ये किंवा आतड्यांमध्ये जडपणा किंवा पोट साफ न झाल्याची भावना सतत होत असल्यास

  कॉम्प्लिकेशन / इतर आजारांना आमंत्रण

  1) रक्तक्षय/ ॲनिमिया:-
  क्वचित, जर मुळव्याधामुळे रक्तस्त्राव होत राहिला तर रक्तक्षय होऊ शकतो, यामध्ये शरीरामधील रक्तामध्ये असणाऱ्या नैसर्गिक लाल पेशी की ज्या शरीरातील सर्व अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा करतात त्यांचे प्रमाण नॉर्मल प्रमाणापेक्षा कमी होते.

  2)स्ट्रँग्युलेटेड हिमोरॉईड्स / मुळव्याध:-
  जर गुदद्वाराच्या आतील बाजूस असणाऱ्या मुळव्याधाच्या गाठींना रक्त पुरवठा बंद झाला तर त्यांना स्ट्रँग्युलेटेड हिमोरॉईड्स म्हणतात, आणि हा प्रकार अतिशय वेदनादायक असतो.

  3) रक्ताच्या गुठळ्या:-
  कधीकधी, मुळव्याधामध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात, जरी या गुठळ्या घातक नसल्या तरी त्या अतिशय वेदनादायक असतात. काहीवेळा या गुठळ्यांना चीर पाडून त्यामध्ये साठलेला स्त्राव किंवा रक्त बाहेर काढावे लागते.

  4) अनियंत्रित शौचास होणे/ बॉवेल इनकॉन्टिनन्स :-
  या प्रकारामध्ये शौचावर नियंत्रण राहत नाही आणि अनियंत्रितपणे शौचास बाहेर येते

  गुदद्वाराच्या आजारांवरील उपचार पद्धती

  लेझर उपचाराचे फायदे

  लेझर शस्त्रक्रिया

  कोणतीही चिरफाड प्रक्रिया नाही

  रक्तस्त्राव नाही.

  वेदनारहित

  24 तासांमध्ये हॉस्पिटल मधून डिस्चार्ज

  कोणत्याही मलमपट्टी ची आवश्यकता नाही

  त्वरित उपचार

  सर्जिकल लायगेशन आणि स्ट्रिपिंग

  बाधित जागेवर चिरफाड करण्याची आवश्यकता

  रक्तस्त्राव होतो

  वेदनादायक

  काही दिवसांनंतर हॉस्पिटल मधून डिस्चार्ज

  जखमेवर मलमपट्टीची आवश्यकता

  2 - 3 बेड रेस्टची आवश्यकता

  आमचे तज्ञ डॉक्टर्स

  डॉ. सुशिल देशमुख

  एम बी बी एस, एम एस
  जनरल सर्जरी,
  फेलोशिप इन मिनीमल एक्सेस सर्जरी,
  लेझर ऍन्ड लेप्रोस्कोपिक सर्जन


  तपासणीचे वार :- सोमवार ते शुक्रवार
  तपासणी वेळ:- सकाळी 10 – दुपारी 2

  डॉ. अनिकेत झारकर

  एम बी बी एस, डी एन बी,
  जनरल सर्जरी,
  फेलोशिप इन मिनीमल एक्सेस सर्जरी,
  लेझर ऍन्ड लेप्रोस्कोपिक सर्जन

  तपासणीचे वार:- सोमवार ते बुधवार, शुक्रवार, शनिवार
  तपासणी वेळ:-
  दुपारी 2 ते संध्याकाळी 5

  अपॉइंटमेंट बुक करा

   खास तपासणी सवलत ओपीडी Rs. 500 100

   Address

   पुणे-सोलापूर रोड, लोणी काळभोर, पुणे

   कॉल

   24/7 - Call 8956970163

   ईमेल

   info@vrhpune.com