फायमोसिस म्हणजे काय? | What is Phimosis?
- Written by: Department Of Obstetrics & Gynecology
- Published: March 15, 2022
- 4 min Read
Video Description
Dr. Jayesh Desale | Sr. Consultant-Paediatric Surgeon ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फायमोसिस म्हणजे काय बद्दल आपल्याला माहिती देणार आहेत.
फायमोसिस म्हणजे काय?
या मध्ये लहान मुलांची लघवीच्या जागेची वरची त्वचा चिटकलेली असते.
या मध्ये दोन प्रकार असतात फिसीओलॉजिकल(Physiological) आणि पॅथॉलॉजिकल (Pathological).
फिसीओलॉजिकल मध्ये ती त्वचा जन्मतः चिकटलेली असते व २-३ वर्षा नंतर ती आपोआप मागे जाते.
पॅथॉलॉजिकल मध्ये त्वचा चिकटल्या मुळे तेथे स्वच्छ न राहिल्यास तेथे इन्फेकशन होते आणि ती त्वचा घट्ट चिकटते.
फायमोसिसची लक्षणे काय असतात?
लघवी करताना त्या जागी फुगा येणे, लघवी नीट क्लिअर न होणे, सारखं लघवीला जाण्यासारखं वाटणं, रात्री गादी ओली होणं.
लघवी नीट क्लिअर न झाल्यामुळे इन्फेकशन चे प्रमाण वाढते आणि हे मूत्रपिंडा परेंत पण पोहचू शकत.
फायमोसिस वर उपचार काय?
यावर दोन उपचार करु शाकतो, वैद्यकीय व्यवस्थापन (Medical Management) व शस्त्रक्रिया व्यवस्थापन (Surgical Management).
वैद्यकीय व्यवस्थापन मध्ये रुग्णाला त्या भागावर मलम लावायला सांगतो, ८०% रुग्णांना मलम लावून फरक पडतो पण काही रुग्णांची त्वचा खूप घट्ट चिकटलेली असते अशा वेळी सर्कम्सिशन (Circumcision Surgery ) ही शस्त्रक्रिया करावी लागते.
ही शस्त्रक्रिया खूप सुरक्षित आहे व एका दिवसा मध्ये करून त्याच दिवशी डिस्चार्ज होऊ शकतो.
आणि या फिमोसिस च्या विषयी पालकांना समजणे खूप गरजेचे आहे या मुळे मुलांचा पुढील होणार त्रास टाळतो.