VishwaRaj

मूळव्याध – लक्षण, कारण आणि उपचार

Video Description

 Dr. Shashank Adgudwar | Consultant-General & Laparoscopic Surgery ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनमूळव्याध – लक्षण, कारण आणि उपचार बद्दल आपल्याला माहिती देणार आहेत.

मूळव्याध म्हणजे काय ?

आपल्या गुदद्वाराच्या मध्ये काही नसा फुगल्या मुळे किंवा त्या मोठ्या झाल्या मुळे, किंवा तेथे कोंब आल्यामुळे किंवा तेथून रक्त येणे अशे बरेच प्रकार असतात,
त्या फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात.

मुळव्याधाचे कारण काय ?

ते म्हणजे बद्धकोष्ठता होणे, शौचालयामध्ये बराच वेळ बसणे,व्यायाम कमी करणे, पाणी कमी पिणे, फायबर युक्त आहार कमी खाणे.
मुळव्याधाची लक्षणे कोणती आहेत?
ज्यावेळी मल बाहेर येते त्या वेळेस रक्तस्त्राव होतो, गुदद्वाराच्या च्या वाटेत खाज येणे, हाताला कोंब लागणे असे काही जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे.

मुळव्याधाचे निदान काय ?

प्रथम डॉक्टर प्रोक्टोस्कोपी नावाची एक तपासणी करतात आणि मूळव्याध आहे कि नाही हे तपासतात मुळव्याधाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हिमोग्लोबिन किंवा रक्त कमी होणे हे मोठे कारण असू शकते, थकवा जाणवणे, अस्वस्थता येणे .
मुळव्याधाचे १ ते ४ ग्रेड असतात त्या प्रमाणे त्यावर उपचार होतात

मुळव्याधावर उपाय काय?

सर्वात नवीन पद्धत म्हणजे लेसर ट्रीटमेंट, स्टेपलर ट्रीटमेंट पद्धत हि ग्रेड ३-४ साठी जास्त उपयोगी ठरते.
मुळव्याध का झाला हे डॉक्टरांना विचारणे गरजेचे आहे कारण सर्वांचे कारण वेगळे वेगळे असू शकते व या मुळे पुन्हा मुळव्याध होण्याची समस्या टळू शकते.
मुळव्याध होण्याच कारण काय ? सर्वोत्तम उपचार पद्धती कोणत्या ? उपचारानंतर कामाला कधी जाऊ शकतो ? मुळव्याध कसा टाळू शकतो हे डॉक्टरांना विचारणे गरजेचे आहे.
तसेच नियमित व्यायाम, हिरव्या भाज्या, फळे यांचा आहारात समावेश करणे, दिवसाला ३ ते ३-१/२ लिटर पाणी प्यावे. हे मुळव्याध न होण्यास खूप उपयुक्त आहे.

Patient also want to know