स्तनाच्या कर्करोगाची १२ लक्षणे शरीराची सामान्य कार्यपद्धती समजावून घेतल्यास विवीध प्रकारच्या समस्या शोधणे शक्य होईल. ज्या बदलांमधून लोक जाणार असतील त्या बदलां बद्दल जर ते जास्त प्रमाणात जागरूक असतील तर, कर्करोग लवकरात लवकर शोधण्यास शक्य होईल. कोणत्याही प्रकारची समस्या शोधण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्तनाचा पर्कीनेस, त्याची रचना आणि आकार माहित असला पाहिजे. तथापि, जर काही समस्या तुमच्या लक्षात आल्या तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्वरित तुमच्या डॉक्टरांना संपर्क करा.


▪️स्तनाच्या कर्करोगाची काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे :
स्तनाच्या कर्करोगाचे कोणतेही एक लक्षण नाहीये, जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर, तुम्हाला त्याची बरीच लक्षणे सापडतील. आम्ही काही लक्षणे खाली नमूद केली आहेत ज्याच्या मदतीने तुम्हाला जर काही समस्या असेल तर त्याची तपासणी करण्यास तुम्हाला मदत होईल.
▪️निपल्स मधुन स्त्राव येणे :
निपल्स मधुन स्त्राव येणे हे खुप काळजी करण्यासारखे लक्षण नाहीये कारण स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही दोन्ही स्तनांमधून स्त्राव येत असतो. तथापि, जर हा स्त्राव फक्त एकाच स्तना मधुन येत असेल तर हे कर्करोगाचे सुरवातीचे लक्षण असु शकते. याव्यतिरिक्त, जर हा स्त्राव क्लिअर किंवा रक्ता सारखा दिसणारा असेल तर तो बराच वेगळा असतो. तथापि, अजुन काही इतर कारणे आहेत ज्यामुळे तुम्हाला निपल्स मधुन स्त्राव येण्याचा अनुभव येऊ शकतो ती खालीलप्रमाणे :
– निपल्स पिळल्या कारणाने
– जंतु संसर्ग असेल तर
हे कर्करोगाचे लक्षण आहे किंवा नाही याने काही फरक पडत नाही, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटलेच पाहिजे
▪️लंप्स / स्तना मधील गाठी :
लंपी ब्रेस्ट म्हणजे स्तनामध्ये गाठी असणे हे काही घातक नाही कारण स्तना मधील टिश्यु हे लंपी टेक्सचरचेच असतात. लंपीनेस हा विवीध प्रकारचा असु शकतो. तथापि, हा लंपीनेस संपूर्ण स्तनामध्ये एकसारखा असेल तर, स्तनाचा कर्करोग असण्याच्या शक्यता कमी होतात. परंतु जर तुम्ही खाली नमूद केलेली परिस्थिती अनुभवत असाल तर, तुम्ही ती तपासून घेतली पाहिजे खुप उशीर होण्या आधी :
– कठीण गाठ जी नेहमी सारखी नसते आणि इतर गाठी पेक्षा वेगळी असते.
– तुम्हाला गाठ फक्त स्तनाच्या एकाच बाजूला असते तेव्हा.
– तुम्हाला तुमच्या स्तनाच्या टेक्सचर मध्ये काही बदल जाणवत असेल तर, परंतु हा बदल तुमच्या मासिक पाळीच्या सायकल मुळे झालेला नसतो.
कर्करोगाच्या गाठी या नेहमी कडक, वेदनारहीत आणि त्यांच्या आणि त्याच्या कडा या असमान असतात. त्याचवेळी त्या गाठी गोलाकार, मऊ आणि टेंडर देखील असु शकतात. त्यामुळे असा सल्ला दिला जातो की, जर तुम्हाला काही संशयास्पद जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांकडुन तपासून घ्या.
▪️स्तनाच्या आकारामध्ये बदल होणे :
जर तुम्हाला तुमच्या स्तनामध्ये सुज जाणवत असेल आणि ही सुज तुमच्या मासिक पाळी बरोबर संबंधित नसेल तर, हे काळजी करण्याचे कारण आहे. याशिवाय, जर एकाच स्तनाचा आकार वाढत असेल तर धोका सुद्धा वाढत असतो. तथापि, दोन्ही स्तनांचा आकार वेगवेगळा असणे सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला तुमच्या स्तनाच्या आकारामध्ये अचानक वाढ झालेली जाणवत असेल, तर ते मात्र असामान्य आहे. तुम्हाला या बदलाचे डॉक्टरांकडुन मूल्यांकन करून घेतले पाहिजे.
▪️तुमच्या स्तनावर काही मार्क / चिन्ह / डाग :
नेहमी, स्त्रीया स्तनावरील लालसर आणि पांढऱ्या रंगाच्या डागांकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांना वाटते हे डाग खराब झालेल्या ब्रा मुळे किंवा जड पर्स मुळे पडलेले आहेत. तथापि, जर तुम्हाला तुमच्या स्तनांवरील त्वचा जाडसर झालेली जाणवत असेल आणि ती त्वचा तंतोतंत वेल्ट सारखी दिसत असेल, तर हे सामान्य नाही आहे. हे वेगळ्या प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगाचे लक्षण आहे ज्याला इनफ्लामेट्री ब्रेस्ट कॅन्सर असे म्हणतात. याव्यतिरिक्त, जवळपास 10 टक्के स्तनाचे कर्करोग हे या प्रकारचे असतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे बदल जाणवत असतील तर, त्वरित त्याची तपासणी करून घेण्यास जा.
▪️इन्व्हर्टेड निपल :
जर तुम्हाला जन्मताच इन्व्हर्टेड निपल असेल तर हे पूर्णपणे सामान्य आहे. परंतु जर हे अचानक झाले असेल तर हे स्तनाच्या कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असु शकते. जास्तकरून, हे लक्षण एकाच स्तनामध्ये असते. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांकडुन त्वरित तपासून घ्या.
▪️त्वचेच्या समस्या :
जर तुम्हाला निपल्स च्या सभोवती खवले, सोअर किंवा खाज सुटलेली जाणवत असेल तर हे एखादा कीटक चावल्यामुळे असु शकते.तथापि, हे स्तनाच्या कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण देखील असु शकते. आपल्या सगळ्यांनाच शरीराच्या विवीध भागांवर रॅशेश येत असतात परंतु, जर या रॅशेश दीर्घ काळा पर्यंत तशाच राहिल्या तर ती एक समस्या असु शकते. याव्यतिरिक्त, हे रॅशेश स्टिरॉइड क्रीम आणि हायड्रोकॉर्टीसॉन लावले तरीही जात नसतील तर तुम्हाला त्वरित त्याकडे लक्ष दिले पाहिजे.
▪️तुमच्या काखे मध्ये टेंगुळ / गाठ येणे :
स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे तुम्हाला फक्त स्तनावरच सापडतील असे नाही परंतु ती तुम्हाला तुमच्या काखेमध्ये सुद्धा दिसून येऊ शकतील. जेव्हा तुम्हाला तुमच्या काखेमध्ये टेंगुळ किंवा गाठ आलेली असेल तेव्हा ही गाठ केसतोड्यामुळे आली असेल असा विचार करण्याची प्रथा असते. तथापि, ही गाठ तुमच्या काखे मध्ये वाढत असलेल्या लिंफ नोड मुळे असु शकते, याला बायोप्सी या तपासणीची आवश्यकता असते.
▪️सोअर स्पॉट :
स्तनाचा कर्करोग हा बिल्कुल वेदनादायक नसतो. तथापि, काहीवेळा वेदना या स्तनामध्ये एखाद्या ठिकाणीच होत असतात. त्याचबरोबर, तुम्ही त्यावर बोट देखील ठेऊ शकता. जर तुम्हाला सोअर स्पॉट किंवा कोणतीही त्रासदायक परिस्थिती असेल तर, तुमच्या डॉक्टरांना त्वरित भेटा.
▪️स्ट्रेच आऊट स्किन :
छातीच्या भागामध्ये तुमची त्वचा कशी दिसते याबाबत नेहमी काळजी घ्या. जर तुम्हाला कोणतीही कर्करोगाची टिश्यु निर्माण झाली असेल तर त्यामुळे तुमची त्वचा एका बाजूला खेचली जाते किंवा दुसऱ्या बाजूला पसरलेली असते. त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या स्तनाची त्वचा खेचल्या सारखी वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवा.
▪️शरीराच्या विवीध भागांमध्ये वारंवार वेदना होणे :
जर तुम्हाला तुमच्या शरीराच्या विवीध भागां मध्ये उदा. पाठ, डोके किंवा हाडे यांमध्ये वेदना होत असतील तर तुमच्या डॉक्टरांचे समुपदेशन घ्या. ह्या वारंवार होणाऱ्या वेदना कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असु शकतात. तथापि, वेदना होण्याची इतरही कारणे असु शकतात.
▪️तुमच्या वजनामध्ये बदल :
जर तुमच्या वजनामध्ये अचानक वाढ किंवा घट झाली असेल तर हे सामान्य नाही आहे. याशिवाय, जर याच्या पाठोपाठ तुमची भूक कमी झाली असेल आणि तुमची कंबर बारीक झाली असेल तर, तुम्ही त्याकडे लक्ष दिले पाहिजे. होय, हे बऱ्याच कारणांमुळे असु शकते, परंतु हे एक धोक्याचे लक्षण सुद्धा असु शकते. त्यामुळे हे कर्करोगामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे असेल तरीसुद्धा त्याचे मूल्यांकन करून घ्या.
▪️श्वास घेण्यामध्ये समस्या :
स्तनाचा कर्करोग हा नेहमी स्तनापासून सुरु होतो परंतु तो संपूर्ण शरीरामध्ये कोठेही पसरण्यास सक्षम असतो. जेव्हा तो शरीराच्या इतर भागा पर्यंत पसरतो तेव्हा त्याला मेटॅस्टॅटीक ब्रेस्ट कॅन्सर असे म्हणतात. याव्यतिरिक्त, सामान्यपणे कर्करोग शरीराच्या ज्या भागांमध्ये पसरतो ते भाग म्हणजे फुफ्फुस, यकृत, हाडे आणि मेंदू हे आहेत. त्यामुळे, जर तुम्हाला हाडां मध्ये वेदना होत असतील किंवा कोणतीही श्वसनाची समस्या होत असेल तर ती कर्करोगामुळे असेल. तुमच्या शरीराच्या इतर कोणत्या तरी अवयवा मध्ये कर्करोगाच्या पेशी वाढत असल्याची दाठ शक्यता आहे.
▪️निष्कर्ष :
जर तुम्ही स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या काळामध्ये निदान करून घेतलेत तर, त्यामधुन रिकव्हर होण्याची शक्यता 99% इतकी वाढते. वरील सर्व लक्षणे लक्षामध्ये ठेवा आणि तुम्हाला यातील एका जरी लक्षणाचा अनुभव येत असेल तर त्वरित तुमच्या डॉक्टरांना दाखवा.