आदरणीय डॉ.आदिती राहुल कराड यांना पुण्यनगरीतील नवदुर्गा पुरस्कार २०२३ मिळाला!
दि. २२ ऑक्ट. २०२३ माईर्स ट्रस्ट च्या मेंबर ट्रस्टी आणि विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ.आदिती राहुल कराड यांना वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी साठी पुण्य-नगरीतील “नवदुर्गा पुरस्कार २०२३ ने सन्मानित केले गेले.
डॉ.आदिती राहुल कराड या नेहमीच ग्रामीण भागातील रुग्णसेवेवर भर देऊन त्यांना उच्च दर्जाची रुग्ण सेवा देण्यावर भर देत आहेत, त्यांनी कोविड काळात केलेल्या विशेष सेवेचा यावेळी उल्लेख केला गेला, डॉ.आदिती कराड नेहमीच वैद्यकीय सेवेत उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या भरीव कार्याचा हा विशेष पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
ह्या कार्यक्रमासाठी पुण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.