लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये ‘जागतिक फिजिओथेरपी दिन’ उत्साहात साजरा
Date : 10/09/2023 News Source From : Pune Prime News
जागतिक फिजिओथेरपी दिन 8 सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. या वर्षीचा दिवस म्हणजे संधिवात या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा करण्यात आला. याचदिनाचे निमित्त साधून लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विश्वराज हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी टीमने मॅनेजमेंट टीमसह फिजिओथेरपी दिनाच्या जनजागृतीसाठी एक कार्यक्रम आयोजित केला. ज्यामध्ये रुग्ण आणि संबंधित डॉक्टरांना आमंत्रित करण्यात आले होते. सुधीर उत्तम (युनिट हेड), डॉ. तबरेज पठाण, डॉ. सचिन कातकडे, डॉ. चंद्रकांत सहारे, डॉ. श्रद्धा खुस्पे, डॉ. योगिनी पाटील, डॉ. प्रमोद सुर्वे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला.
फिजिओथेरपीच्या उपचारांबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी फिजिओथेरपी टीमने घेतलेला पुढाकार आणि त्याचे फायदे डॉ. सचिदानद लक्षतवार, डॉ. ओंकार आघाव, डॉ. एलिझाबेथ, डॉ. सॅमसी यांनी सांगितले. या कार्यक्रमात फिजिओथेरपी टीमने त्यांच्या दोन नवीन उपचार सेवा सुरू केल्या आणि या उपचारांविषयी माहिती दिली. यावेळी डॉ. सच्चिदानंद यांनी फिजिओथेरपीचे सध्याचे महत्त्व सांगितले. तर डॉ. ओंकार यांनी उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाविषयी माहितीही दिली.
दरम्यान, या कार्यक्रमादरम्यान विश्वराज हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागात उपचार घेतलेल्या आणि शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांनी त्यांच्या उपचारपद्धतीविषयी माहिती सांगितली