Hadapsar News लोणी काळभोर : “ माईर्सचे विश्वराज क्लिनिक” मध्ये नागरिकांना पॅथॉलॉजी व फार्मसी सेवांसह आठवड्याचे सातही दिवस सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत सर्वसमावेशक सल्ला दिला जाणार आहे. (Hadapsar News ) अशी माहिती विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती कराड यांनी दिली आहे. (Hadapsar News)
“माईरचे विश्वराज क्लिनिक” चे उद्घाटन डॉ. अदिती कराड यांच्या हस्ते
हडपसर येथील फ्युचर टॉवर्स अॅमनोरामध्ये “माईर्सचे विश्वराज क्लिनिक” चे उद्घाटन डॉ. अदिती कराड यांच्याहस्ते सोमवारी (ता.३) करण्यात आले. यावेळी बोलताना कराड यांनी वरील माहिती दिली. यावेळी विश्वराज हॉस्पिटलचे महाव्यवस्थापक सुधीर चंद्र उत्तम, सहायक महाव्यवस्थापक डॉ तबरेज पठाण, डॉ. सचिन कातकडे, डॉ. नवीन व्यास, प्रवीण कुमार, ॲमनोराचे सीनियर क्लब सेक्रेटरी शिवकुमार गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. अदिती कराड म्हणाल्या कि, “माईर्सचे विश्वराज क्लिनिक” सुरु झाल्यामुळे हडपसर परिसरातील रहिवाशांना आता विश्वराज हॉस्पिटलमधील प्रशिक्षित आणि अनुभवी डॉक्टरांच्या कौशल्याचा आणि अनुभवाचा योग्य लाभ घेता येणार आहे.
दरम्यान, विश्वराज हॉस्पिटलचे उद्दिष्ट्ये हि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आहेत. हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रगत आरोग्य सेवा आणि कल्याण सेवा प्रत्येकासाठी सहज उपलब्ध होत असते. विश्वराज क्लिनिक हे विश्वराज हॉस्पिटलचा विस्तार म्हणून काम करते. तसेच एका छताखाली संपूर्ण आरोग्यसेवा समाधान प्रदान करते, तज्ञांना तुमच्या जवळ आणते. असेही डॉ. अदिती कराड यांनी सांगितले आहे.
यावेळी हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत हरपळे, कोषाध्यक्ष सत्यवान आटपाडकर, माळवाडी साडेसतरानळी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मनोज कुलकर्णी, डॉ. सदाशिव बोराटे, डॉ. राजेश शिंदे, डॉ. सुरज इंगोले, डॉ.नामदेव जगताप, डॉ.चंद्रकांत सहारे, डॉ. सुशांत शिंदे, डॉ. मोनिका भगत, डॉ. योगिनी पाटील, डॉ. विजय खंडाळे, डॉ.आशुतोष थोरात, डॉ. प्रमोद सुर्वे, डॉ.शाम प्रसाद, डॉ. अनिरुद्ध गरुड, डॉ. सचिन काटकाडे, डॉ. सुशील देशमुख, डॉ.स्वाती खाटमोडे, डॉ. दोशी आशुतोष, डॉ. जिग्नेश मेहता, डॉ.निकिता पाटील, डॉ. रोमी, डॉ. रोहित फडतरे आणि डॉ. आरती फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते.