ओणम’ सणानिमित्त विश्वराज हॉस्पिटलमधील नर्सिंगचे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीचे कपडे परिधान केले होते. (Loni Kalbhor) तर महिलांनी पारंपरिक पद्धतीची कसवू साडी नेसली होती. तसेच विधीनुसार भगवान विष्णू आणि महाबली यांची पूजा करण्यात आली. त्यानंतर एकमेकांच्या भेटी घेऊन एकमेकांना शुभेच्छा देऊन, या सणाचा आनंद द्विगुणीत केला.
विद्यार्थ्यांनी हॉस्पिटलच्या मोकळ्या जागेत फुलांची रांगोळी काढली होती. ओणमच्या निमित्ताने पारंपरिक खाद्यपदार्थ आणि गोड मेजवानीचाही बेत आखला होता. या वेळी २५० हून अधिक लोकांना केरळी शैलीतील जेवण देण्यात आले. तसेच पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, ओणम उत्सव मल्याळी भाषेत चिंगम (ऑगस्ट-सप्टेंबर) या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रल्हादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे.