Heart attack -Diagnosis & Treatment
- Written by: Department Of Obstetrics & Gynecology
- Published: March 10, 2022
- 4 min Read
Video Description
हार्टअटॅक येणे म्हणजे काय ? Dr. Suraj Ingole ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .
हार्टअटॅक येणे म्हणजे काय ?
हृदयाला ज्या नसा रक्तपुरवतात त्या मध्ये ब्लॉक तयार होतो, आधीच्या कॅलेस्ट्रॉलच्या ब्लॉकवर रक्ताची गुठळी येऊन ती नस १०० % बंद होते.
ती नस हृदयाला ज्या भागाला रक्त पुरवठा करते तो भाग काम करणे कमी करतो किंवा काम करायचा बंद करतो.
त्या मुळे रुग्णाला छातीत दुखणे, दम लागणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे ही लक्षणे दिसू लागतात.
हृदय विकाराची लक्षणे काय काय असतात ?
डाव्या बाजूला छातीमध्ये दुखणे, दम लागणे, घाम येणे, पोटाच्या वरच्या भागात दुखणे, पाठीत दुखणे, दोन्ही खांदे दुखणे, गळा दबल्या सारख गळा दुखणे.
हृदय विकाराचे निदान कसे करायचे ?
इलेक्ट्रोकार्डियोग्राम (Electrocardiogram – ECG) काढणे, इकोकार्डियोग्राफी (Echocardiography) करणे, रक्त तपासणी करणे, अँजिओग्राफी (Angiography) करणे त्यामुळे समजते की ब्लॉकेजेस आहेतका किंवा किती प्रमाणात आहेत.
हृदय विकारावर उपाय.
ज्यांना अचानक हार्टअटॅक चालू झाला आहे त्यांना तात्काळ उपचार मिळणं गरजेचं आहे कारण नस १०० % बंद झालेली असते व ती लगेच उघडणे गरजेचे असते, नाहीतर माणसाच्या जीवाचा धोका वाढत जातो.
यात दोन इलाज असतात अँजिओग्राफी (Angiography) आणि अँजिओप्लास्टी (angioplasty) करणे यामुळे रुग्णाचा धोका ९०% पासून ५% परेंत टळतो.
जर हे उपाय करण्यासाठी हॉस्पिटल जवळ नसेल तर योग्य कालावधी मध्ये रक्त पातळ होण्याचे इंजेकशन देऊ शकतो व रक्ताची गुठळी विरघळू शकतो आणि पुढचे उपचार करू शकतो. योग्य उपचारानंतर रुग्णाला रक्त पातळ होयच्या गोळ्या, कोलेस्टेरॉल कमी होयच्या गोळ्या या रुग्णाला कायम चालू राहतात.
विश्वराज हॉस्पिटल मध्ये आपल्या कॅथेटेरायझेशन (cathlab ) मध्ये आपण लगेच अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करतो तसेच आणीबाणी मद्धे २४ तास डॉक्टर्स उपलब्ध आहेत.