Loni Kalbhor News: तब्बल १०६ वर्षांच्या वृद्धाच्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया: लोणी काळभोरच्या विश्वराज हॉस्पिटलमधील डॉक्टरांची कमाल!
Loni Kalbhor News: लोणी काळभोर : लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल करून दाखविली आहे. बीड येथील एका १०६ वर्षांच्या वृद्धाच्या पायावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अतिशय कमी वेळेत पूर्ण करून रुग्णाला जीवदान दिले आहे. त्यामुळे विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अतिशय कमी वेळात यशस्वी शस्त्रक्रिया दामोदर मोरे यांचे मूळ गाव बीड जिल्ह्यात आहे. घराच्या परिसरात फिरत असताना, त्यांचा अचानक तोल गेला आणि ते पाय घसरून जमिनीवर पडले. या अपघातात मोरे यांच्या डाव्या पायाला गंभीर जखम झाली. असह्य वेदना होत असल्याने त्यांना चालणे देखील मुश्किल झाले होते.
मोरे यांना लातूर व बीड येथील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांनंतरही त्यांच्या वेदना कमी झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे चालणे तर अशक्यच झाले होते. (Loni Kalbhor News) गंभीर दुखापत असल्यामुळे मोरे यांनी लोणी काळभोर (पुणे) येथील विश्वराज हॉस्पिटलची माहिती घेतली.
योग्य उपचार होतील याची खात्री पटल्यानंतर मोरे पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. दरम्यान, विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद कुमार सुर्वे, डॉ. रामप्रसाद धर्मगुट्टी, डॉ. विठ्ठल शेंडगे व डॉ. विजय खंडाळे यांच्या टीमने मोरे यांच्या पायावर अतिशय कमी वेळात यशस्वी शस्त्रक्रिया केली व मोरे यांना जीवदान दिले. याबाबत बोलताना विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद कुमार सुर्वे म्हणाले की, अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेला यश येणे या वयामध्ये कठीण असते. (Loni Kalbhor News) रुग्णाची इच्छाशक्ती दृढ असेल, तरच
हे शक्य आहे. मोरे यांच्या नातेवाईकांनी योग्य वेळेत निर्णय घेऊन शस्त्रक्रियेस मान्यता दिल्यामुळे त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेला यश येऊन मोरे हे त्यांच्या पायावर चालत घरी गेले.