Covid 19 in New Born in Marathi
- Written by: Department Of Pediatrics
- Published: February 25, 2022
- 4 min Read
Video Description
बाळांमध्ये कोविड | Covid 19 in New Born in Marathi | Dr. Chandrakant Sahare ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .
What should I do if my child has symptoms of covid-19?
तिन्ही लाटेच्या अभ्यासा नंतर अस लक्षात आलं की लहान बाळांना कोविड आजार आणि संसर्ग कमी प्रमाणात होतो
पाहिलं कारण आपण लहान बाळांना संरक्षित ठेवतो आणि दुसरं कारण कोरोनाविषाणूला जे ace 2 रिसेप्टर शरीरामध्ये प्रवेश करायला लागते
त्याचे प्रमाण लहान बाळांमध्ये कमी असते आणि तिसरं vaccination मुळे त्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती आलेली असते
त्या मुळे छोटी बाळ आजारी पडत नाही छोट्या मुलांमध्ये जे कोविड होत त्यामध्ये ताप सर्वात जास्त येतो आणि १००, १०१, १०२, १०३ अशा प्रमाणात वाढतो
जर एखाद्या बाळाला कोविड झाला तर काय करायच ?
८५ ते ९० % लहान रुग्णांना मध्ये जास्त त्रास नसतो
ज्यांना कावीळ, मधुमेह, हृदयविकार, दमा असतो त्यांना थोडी समस्या असते त्यांनी जरा काळजी घ्यावी जर कोणाला ताप आला तर क्रोसीन, पॅरासिटामोल देऊन तापमान कमी करू शकतो
दुसरी औषधे देऊ नये कारण ती बाळाला हानिकारक असतात त्यांच्या मधील निमोनिया हा सौम्य असतो म्हणून त्याला जास्त उपचार ची गरज पडत नाही
rt pcr test नंतर, +ve असताना होम आयसोलेशन मध्ये त्यांना ठेऊ शकतो होम आयसोलेशन मध्ये त्यांना वृद्ध व्यक्ती जवळ ठेऊ नये
त्यांना भरपूर पाणी पाजणे आणि तापमान कमी ठेवणे बालरोग तज्ज्ञांना भेटून औषधे घेणे १०० डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर आपण त्याला ताप म्हणतो १०० डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर क्रोसीन द्यावी
काही बाळांना high grade ताप मुळे फीट येण्याची शक्यता असते त्यावेळी घाबरून जाऊ नये
क्रोसिन देऊन आणि कोमट पाण्यानी अंग पुसून ताप कमी होण्यास मदत होते व्हिटॅमिन्स सी, डी किंवा इतर व्हिटॅमिन्स आवश्यक असेल तरच देणे कोविड स्वतःहून बरा होतो
५% मुलांमध्ये थोडा अडथळा येऊ शकतो, ऑक्सीजनचे प्रमाण कमी होऊ शकते, निमोनिया होऊ शकतो
सायटोकीने स्टॉर्म (cytokine storm), एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS) चा एक प्रकार असतो या मध्ये बाळाच्या फुफुसामध्ये पाणी वाढते, न्यूमोनिया वाढतो, ऑक्सिजन ची पातळी कमी होते असे काही झाले तर हॉस्पिटल मध्ये दाखल करावे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट उपयोगी ठरते .
रेमडेसिविर इंजेक्शन ऑक्सिजन पातळी कमी असेल तरच द्यावा
काही बाळांना २ ते ३ महिन्यानानंतर कोविड मुळे MIS-C आजार होतो मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम त्यामध्ये बाळाच्या २ – ३ अवयवाना अपाय होतो CNS (central nervous system) केंद्रीय मज्जासंस्थाला त्रास होऊ शकतो असे काही झाले तर बाळाला हॉस्पिटल मध्ये दाखल करावे डॉक्टरांच्या मदतीने योग्य ते औषध उपचार करून कोविड बरा होतो