महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे : विश्वराज हॉस्पिटलमध्ये उर्मी फर्टिलिटी सेंटरचे उद्घाटन
पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील लोणी काळभोरमधील माईर्स विश्वराज हॉस्पिटलतर्फे तत्वदर्शी, प्रज्ञावंत कवयित्री सौ.
उर्मिला कराड यांच्या नावाने सुरू केलेल्या उर्मी फर्टिलिटी सेंटर (आय.व्ही.एफ) च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून महिला व बालविकास मंत्री मा.ना.कु.आदिती तटकरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती कराड होत्या.
यावेळी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उपस्थित होत्या. या प्रसंगी डॉ. चंद्रकांत हरपाले, डॉ. कल्पना खाडे, लोणी काळभोरच्या सरपंच गौरी काळभोर, उपसरपंच ललिता काळभोर यांचा विशेष सत्कार
करण्यात आला.
आदिती तटकरे म्हणाल्या, प्रत्येक हॉस्पिटल असे असावे की, जेथे गरीब रुग्णाला योग्य व माफक दरात उपचार मिळावाच. परंतु, उच्च वर्गातील रुग्णालासुद्धा ही जाणीव होऊ देऊ नये की, त्याला त्याच्या सुविधांनुसार उपचार
मिळत नाहीत. पण, विश्वराज हॉस्पिटलमध्ये दोन्ही वर्गातील रुग्णांसाठी योग्य अत्याधुनिक सुविधा आहेत.
राहुल कराड सर म्हणाले, ज्यांना मातृत्व हवे असेल अशा महिलांसाठी उर्मी आयव्हीएफ सेंटर नक्कीच लाभदायक ठरेल. आईच्या नावाने सुरू केलेल्या उर्मी आयव्हीएफ सेंटर नक्कीच मातृत्वाच्या चेहऱ्यावर हास्य आणेल.
डॉ. अदिती कराड म्हणाल्या, मातृत्व हा विषय केवळ त्या महिलाशी नाही तर संपूर्ण कुटुंबाशी निगडीत असतो. यावेळी त्या महिलेच्या मानसिकतेचा विचार करणे खूप गरजेचे आहे. उर्मी सेंटर नक्कीच सर्वांसाठी वरदान ठरणार आहे. हर्षा पालवे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संतोष पवार यांनी आभार मानले.