Best Hospital in Pune MAEER'S VishwaRaj Hospital | VishwaRaj Hospital | MAEER'S VishwaRaj Clinic Amanora | MAEER'S VishwaRaj Clinic Kothrud, Best Hospital in Pune, Hospital Lonikalbhor, Uruli kanchan, Best Hospital in Hadapsar, Best Hospital in Pune, Vishwaraj Hospital top 10 Hospital in Maharashtra, Vishwaraj Hospital Largest Hospital in Pune Maharashtra

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये ‘राष्ट्रीय पोषण सप्ताह 2023’ साजरा

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल मध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह 2023 साजरा

Date : 09/09/2023 , Source From Pune Prime News

Loni Kalbhor News : लोणी काळभोर, ता. ०८ :  भारतात 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण सप्ताह 2023 साजरा करण्यात आला. समाजात निरोगी आहार आणि जीवनशैलीबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो. यंदाची थीम आरोग्यदायी आहार-सर्वांसाठी परवडणारा आहे. लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय पोषण सप्ताह 2023 साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय पोषण सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद

विश्वराज हॉस्पिटलमध्ये पोषण सप्ताह साजरा करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सुधीर उत्तम (युनिट हेड), शिवचरण (प्राचार्य-विश्वराज नर्सिंग कॉलेज), डॉ. श्रद्धा खुस्पे (एचओडी-डाएटीशियन आणि न्यूट्रिशन), हर्षा पालवे (एचओडी-एचआर) आणि डॉ. स्वाती खारतोडे (सल्लागार-आहारतज्ञ आणि पोषण) या मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी विश्वराज हॉस्पिटलने कर्मचाऱ्यांसाठी सकस आहार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी आरोग्यदायी सॅलड सादर केले. सकस आहाराबाबत जागरूकता वाढवणे हा यामागचा उद्देश होता. सर्व कर्मचार्‍यांनी उत्साहाने यात सहभाग घेतला. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षीसेही दिली जाणार आहेत. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. श्रद्धा खुस्पे, हर्षा पालवे, डॉ. स्वाती खारतोडे काम पाहिले. विश्वराज हॉस्पिटलमध्ये साजरा करण्यात आलेल्या राष्ट्रीय पोषण सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top

What Would You Like To Do Today?​​