Importance of sunscreen in skincare
- Written by: Department of Dental Sciences
- Published: June 17, 2022
- 4 min Read
Video Description
Importance of sunscreen in skincare | Dr. Harsha Mahajan ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .
आज आपण सनस्क्रीन बद्दल माहिती जाणून घेऊयात. सनस्क्रीन का वापरावे सूर्यप्रकाशामध्ये जे अल्ट्रा व्हायलेट किरण असतात ते आपल्या स्किन ला डॅमेज करतात. यामुळे सनबर्न किंवा स्किन टॅंनिंग चे धोखे असतात.
चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, काळे डाग पडणे, स्किन टॅन होणे या गोष्टींचा धोखा कमी व्हावा म्हणून आपण सनस्क्रीनचा वापर करावा. आता सनस्क्रीन चे प्रकार कोणतेकोणते असतात ते आपण पाहुयात.
एक फिझिकल सनस्क्रीन आणि दुसरे केमिकल सनस्क्रीन. फिझिकल सनस्क्रीन मध्ये titanium dioxide आणि zinc oxide हे घटक असतात हे यूव्ही किरणांना आपल्या स्किन पर्यंत पोहचू देत नाहीत .
जे केमिकल सनस्क्रीन असतात त्यामध्ये कार्बन based केमिकल particles असतात. ते ultraviolet किरणाशी react करून स्किन चे संरक्षण करतात. सनस्क्रीन म्हणजे कि एक शब्द येतो तो म्हणजे s.p.f सन प्रोटेक्शन फॅक्टर. spf १५ हे आपल्या स्किन ला ९३ % प्रोटेक्शन देते. spf ३०. ९७% प्रोटेक्शन देते. spf ५० हे ९८ % प्रोटेक्शन देते. spf ७० हे ९८. ५ % प्रोटेक्शन देते.
मार्केट मध्ये spf ५० आणि त्या पुढील प्रॉडक्ट अव्हेलेबल आहेत. परंतु त्याचे फायदे मार्जिनली जास्त आहेत. आणि किंमत खूप जास्त आहे. यानंतर असते ते PA रेटिंग _ आपण PA ++ आणि PA +++ हे पण पाहून घेतले पाहिजेत.
याशिवाय जे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आणि ज्यांना नेहमी घरातून बाहेर पडावे लागते त्यांनी water resistant / sweat resistant सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे.
सनस्क्रीन हे चेहरा, मान , हात पाय सगळीकडे लावावे. सनस्क्रीन घरातून २०-३० मिनिटे बाहेर पडायच्या अगोदर लावले पाहिजे. तुम्ही घरामध्ये आहा त किंवा बाहेर आहात किंवा ढगाळ वातावरण आहे किंवा कमी सूर्यप्रकाश आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये मध्ये सनस्क्रीन वापराने तितकेच गरजेचे आहे. दिवसातून ३ ते ४ तासांनी सनस्क्रीन रिअँप्लिकेशन करणे गरजेचे आहे. . जर पाण्यामुळे किंवा घामामुळे सनस्क्रीन निघून गेले तर ते लगेच लावावे. बरीच लोक regular make up products वापरतात तर त्यांनी सनस्क्रीन वापरायचं का तर हो नक्की. फॉउंडेशन based / tinted सनस्क्रीन सुद्धा अवेलबल आहेत.