पोटाच्या वरील भागात दुखणे किंवा पूर्ण पोटात कळा येणे किंवा पोटात फुगारा येणे ,पोटात गॅस होणे किंवा छातीत जळजळ होणे पोटातील आम्ल किंवा सामग्री अन्ननलिकेत येणे अशाप्रकारच्या समस्या घेऊन भरपूर रुग्ण आमच्याकडे येतात सहसा या त्रासाचे कारण हे ऍसिड पेप्टिक डीसीज असू शकतात जेव्हा पोटातील आम्ल किंवा सामग्री अन्ननलिकेत येते आणि इजा करते तेव्हा आपण त्याला आपण GERD (GASTRO ESOPHAGAL REFLUX DISEASE )असे म्हणतो
अशी लक्षणे तुम्ही जर अनुभवत असाल तर तुम्हाला डॉक्टरांना भेट देणे आवश्यक आहे यामध्ये डॉक्टर तुम्हाला तपासतील तसेच तुम्ही जर मद्यपान किंवा धूम्रपान करत असाल तसेच जर अनियमित झो किंवा जेवण करत असाल तर या गोष्टी थांबवल्या जातात .
तसेच गरज भासल्यास तुम्हाला एन्डोस्कोपी करण्यास सांगितली जाईल जी केल्याने तुम्हाला ऍसिड पेप्टिक डीसीज झाला आहे का किंवा झाला असल्यास तो कितपत झाला आहे तसेच तुमच्या पोटाला काही इन्फेक्शन झाले आहे का हे तपासले जाते एन्डोस्कोपी च्या निरीक्षणा नंतर तुम्हाला विशिष्ट प्रकारची औषधे दिली जातात.
ऍसिड पेप्टिक डीसीज हा पूर्णपणे बरा होऊ शकतो हा आजार बरा करण्यासाठी तुम्हाला तुमची दैनंदिन जीवनशैली बदलावी लागते आणि औषधें घ्यावी लागतात ज्यामुळे हा आजार पूर्णपणे बरा होतो