What is Oral Maxillofacial Surgery?
- Written by: Department of Dental Sciences
- Published: April 6, 2022
- 4 min Read
Video Description
Listen to Dr. Rajat Bhende to know about Oral Maxillofacial Surgery
नमस्कार माझे नाव डॉ रजत भेंडे आणि मी विश्वराज हॉस्पिटल मध्ये ओरल आणि मॅक्झीलो फेशियल सर्जन म्हणून कार्यरत आहे.
मी आज आपणाला ओरल आणि मॅक्झीलो फेशियल सर्जरी म्हणजे नेमके काय हे सांगणार आहे ओरल म्हणजे आपले तोंड आणि मॅक्झीलो फेशियल म्हणजे आपल्या नाकाच्या वरच्या भागापासून ते वरच्या दातांपर्यंतचा भाग . अनेकवेळा आपण ऐकतो कि आपल्या अक्कलदाढा या हाडांमध्ये असतात त्या लवकर वरती येत नाहीत तर त्या काढण्याचे काम हे मॅक्झीलो फेशियल सर्जन करतात डेंटल इम्प्लांट हि एक नवीन उपचारपद्धती आहे जी सर्वाना हवी असते ते हि काम हे सर्जन करतात.
काही वेळा अपघात मध्ये किंवा गाडीवरून पडल्यामुळे आपला जबडा फ्रॅक्चर होतो तर त्याचे उपचार पण हे मॅक्झीलो फेशियल सर्जन करतात तसेच काही बाळांना जन्मतः’ ओठांना चीर असते किंवा टाळू ला चीर असते तर ते हि काम हे मॅक्झीलो फेशियल सर्जन करतात काही वेळा आपल्या चेहऱ्यावरती
आजकाल बऱ्याच लोकांना वाटते कि आपला चेहरा छान दिसावा, काही लोकांचा वरचा जबडा बाहेर असतो खालचा जबडा आत असतो तर अशा सर्जरी सुद्धा
मॅक्झीलो फेशियल सर्जन करतात. आजकाल तरुण मुलांना सुपारी किंवा तंबाखू खाण्याची सवय असते या लोकांना जिभेचा कॅन्सर टाळूचा कॅन्सर दातांचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते तर त्या हि सर्जरी सुद्धा मॅक्झीलो फेशियल सर्जन करतात. तर मित्रांनो तुम्हाला उपैकी कोणताही त्रास असेल तर तुम्ही विश्वराज हॉस्पिटल ला भेट देऊ शकता.